शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Opinion Poll: राज्यात सेना-भाजपाला फटका बसणार; 'इतक्या' जागा घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:31 IST

आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्लीः देशात जोरदार प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच आता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं सर्व्हे केला आहे. त्यात सेना-भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. मागच्या वेळच्या तुलनेत एनडीएच्या 4 जागा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा युतीला 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, काँग्रेस आघाडीला 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2014ला एनडीएला महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या, यूपीएला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सेना-भाजपाच्या चार जागा घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 2014मध्ये सेना-भाजपाला 51.3 टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेस आघाडीच्या खात्यात 34.1 टक्के मतं जमा झाली होती. तर यंदा सेना-भाजपाच्या मतांच्या टक्केवारी घट होणार असून, त्यांना 48.15 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीला 36. 88 टक्के मतं मिळणार आहेत, असं या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर एबीपी-सी व्होटरनं केलेल्या सर्व्हेतही सेना-भाजपाच्या जागा घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यातील 48 पैकी 35 जागांवर युती विजयी होईल, अशी शक्यता या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आली आहे. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, यंदा राज्यात भाजपा-शिवसेना युतीला एकूण 35 जागांवर यश मिळू शकतं.यंदा भाजपा 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील 21 जागांवर त्यांना यश मिळेल, असा अंदाज आहे. मात्र गेली साडेचार वर्षे सरकारवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. 23 जागा लढवणाऱ्या शिवसेनेला 14 जागांवर यश मिळू शकतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे 18 उमेदवार विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांना 4 जागांवर फटका बसू शकतो. तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची केवळ एक जागा कमी होईल, असा अंदाज आहे. 2014 मध्ये युतीनं राज्यात 42 (भाजपा-22, शिवसेना-18, स्वाभिमानी-1) जागा जिंकल्या होत्या. त्यात यंदा सात जागांची घट होऊ शकते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस