शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

"'या' चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं"; राष्ट्रवादीने मोदींना लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 14:38 IST

NCP Slams Narendra Modi Over Corona virus And the Conversation Poll : कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. एकून कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर पोहोचली आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान देशात कोरोनामुळे निर्माण झालेलली स्थिती, रुग्णालयातील बेडची कमतरता आणि ऑक्सिजनचा मोठा तुडवडा यावून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधकही विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. 

जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अमेरिकेतील 'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाईटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली आहे. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सणसणीत टोला लगावला आहे. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. सर्वांत वाईट कामगिरीसाठी मोदींना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "'द कॉन्व्हर्सेशन' वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"काही दिवसांपूर्वी 'द डेली गार्डियन' या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपने केला. त्या तुलनेत 'द कॉन्व्हर्सेशन' हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा!" असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये विविध राज्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Mamata Banerjee) हजर होत्या. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच नाही दिलं"; मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या, केले गंभीर आरोप

ममता यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिलं नाही असं म्हणत त्यांनी मोदींच्या बैठकीनंतर आपला संताप व्यक्त केला आहेत. तसेच केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे."या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपाचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

भयावह! कोरोना मृतांची खरी आकडेवारी भलतीच; 60 ते 80 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता, WHOचा मोठा खुलासा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. कोरोना महामारीत होणाऱ्या सर्वच मृत्यूंची नोंद झालेली नाही असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सरकारी आकडेवारीनुसार जे आकडे आपल्यासमोर येत आहेत त्यापेक्षा खूप जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. WHO म्हणण्यानुसार आतापर्यंत 60 ते 80 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, आत्तापर्यंत अधिकृत जगात 34.46 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वार्षिक ग्लोबल हेल्थ स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट जारी करताना जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, कोरोनामुळे वर्ष 2020 मध्येच जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जगातील विविध देशांनी केलेल्या नोंदीनुसार ही आकडेवारी 12 लाखांच्या आसपास आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारत