शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 09:49 IST

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

ठळक मुद्देदिल्लीत नवी संसद भवनाचे काम जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

मुंबई : 'युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडे फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील म्हणून पाहता? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. "युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच", असे ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीत नवी संसद भवनाचे काम जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला होता. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी," असे म्हणत अतुल भातखळकरांनी रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांवर टीका केली.

काय म्हणाले होते रोहित पवार?"प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा' प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही," असे ट्वीट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारण