शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी 'बनारस मॉडेल', नरेंद्र मोदींवर नवाब मलिकांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 16:48 IST

Nawab Malik : 'बनारस मॉडेल' हे 'निदान मॉडेल' सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा प्रचार बंद करा, असेही नवाब मलिक म्हणाले.

ठळक मुद्दे"कोरोना काळात ना टेस्टिंग होत होती. ना उपचार होत होते. औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळ्याबाजाराने विकला गेला"

मुंबई : देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 'बनारस मॉडेल' चा प्रचार करण्यात येत आहे. मात्र कोरोना काळातील असमर्थता लपवण्यासाठी हा प्रयत्न आता केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.  (NCP Leader Nawab malik criticized PM Narendra Modi on 'Benaras Model')

बनारसच्या घाटावरील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी मृतदेह गंगा नदी टाकले. या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारस मॉडेल बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र बनारस मॉडेल काही नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, याठिकाणी कोरोना काळात ना टेस्टिंग होत होती. ना उपचार होत होते. औषधांचा काळाबाजार झाला. ऑक्सिजन काळ्याबाजाराने विकला गेला. 'बनारस मॉडेल' हे 'निदान मॉडेल' सारखे फेल गेले आहे. त्यामुळे बनारस मॉडेलचा प्रचार बंद करा, असेही नवाब मलिक म्हणाले.

"मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत"दरम्यान, काल (दि.२१) नवाब मलिक यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे, ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळत आहे. कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवणे हे राजकारण बंद करावे, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. 

याचबरोबर, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे १६ टक्के आरक्षण योग्यच आहे, तशी भूमिका केंद्राने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे.  तसेच, देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे वकिलांना 'चित भी मेरी और पट भी मेरी' या पद्धतीने बोलता येते असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे. 

(शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना)

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसVaranasiवाराणसी