शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

'सात वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही', नवाब मलिकांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 18:39 IST

Nawab Malik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली, त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

ठळक मुद्देभाजपाच्या सात वर्षाच्या राजवटीत सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मुंबई: नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली पण सात वर्षात मोदी सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरले आहे, असा आरोप काँग्रेसने करत मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला. तर राष्ट्रवादीने भाजपा सरकावर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली, त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. (NCP slams PM Modi on his government's 7th anniversary)

यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. 'सात वर्षात महागाई कमी झाली नाही. पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाहीत. दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही. मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म आणि केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी दुसऱ्या टर्ममध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले. तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली, असे नवाब मलिक म्हणाले.

'सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही'कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. सात वर्षात देशात गरीब गरीबच राहिला. बेरोजगारी वाढली. महागाई जास्त झाली. भाजपाच्या सात वर्षाच्या राजवटीत सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस