शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'गोडसेनं एकाला मारलं; राजीव गांधी 17 हजार जणांच्या मृत्यूला जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 12:46 IST

साध्वी प्रज्ञा सिंह, अनंत कुमार हेगडेंनंतर आणखी एक भाजपा नेता बरळला

नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर टीका झाल्यानंतर आता भाजपाचे खासदार वादात सापडले आहेत. भाजपा खासदार नलीन कुमार कतील यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींची तुलना गोडसेशी केली आहे. 

'गोडसेनं एकाला मारलं. कसाबनं 72 जणांची हत्या केली. राजीव गांधींनी 17 हजार जणांना मारलं. आता तुम्हीच ठरवा अधिक क्रूर कोण,' असं कतील यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यावरुन कतील यांच्यावर सोशल मीडियानं जोरदार टीका केली. यानंतर लगेचच कतील यांनी ट्विट डिलीट केलं. 'माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. अनेकांनी त्यावर आक्षेप घेताच मी ट्विट हटवलं. आता यावरील चर्चा थांबवू या,' असं नवं ट्विट कतील यांनी केलं.नलीन कतील दोन वेळा भाजपाकडून लोकसभेवर गेले आहेत. दक्षिण कन्नडा मतदारसंघातून ते निवडून गेले. कतील यांच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. 'काँग्रेसच्या दरबारातली नेतेमंडळी राजीव गांधींना मिस्टर क्लीन म्हणून गाजावाजा करायची. पण नंबर भ्रष्टाचारी म्हणून त्यांचं आयुष्य संपलं,' अशा शब्दांत मोदींनी राजीव गांधींवर टीका केली होती. राजीव गांधींनी आयएनएस विराटचा स्वत:च्या कुटुंबासाठी टॅक्सीसारखा वापर केला, असा दावादेखील त्यांनी केला होता.राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं काल भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर भाजपानं त्यांना माफी मागण्याची सूचना केली. यानंतर सिंह यांनी माफीदेखील मागितली. मात्र गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केलं. या प्रकरणी माफीपासून पुढे जायला हवं. आपण आता पुढे जाणार नाही, तर केव्हा जाणार?, असं ट्विट हेगडेंनी केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajiv Gandhiराजीव गांधीNathuram Godseनथुराम गोडसेSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाAnantkumar Hegdeअनंतकुमार हेगडेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी