शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

संजय राऊतांनी 'पायरी' दाखविल्यानंतर नाना पटोले संतापले; म्हणाले, 'आमच्या टेकूवर ठाकरे सरकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 12:51 IST

Nana patole Warn Shivsena leader Sanjay Raut: संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay raut ) युपीएवरून वक्तव्ये केल्याने काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत काय शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, तर सचिन सावंतांनी राऊतांचा युपीएशी काय संबंध असे प्रश्न विचारले होते. यावर राऊतांनी युपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय राज्य स्तरावरील, जिल्हास्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असे सुनावले होते. या वक्तव्यावरून पटोले (Nana Patole) संतापले आहेत. (Shivsena in power with help of Corngress, will complaint against Sanjay raut to CM Uddhav Thackreay: Nana Patole)

संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल, राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलेय, हे शिवसेनेने लक्षात ठेवावे असा इशारा दिला आहे. तसेच राऊतांनी युपीएसाठी शरद पवारांची वकीली बंद करावी असेही बजावले आहे. भिवंडीत नाना पटोले बोलत होते. 

संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी युपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याचे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. राऊत पवारांची वकीली करत आहेत, यावरून पवार राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल असा टोला पटोलेंनी लगावला. लवकरच राऊतांची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. 

संजय राऊत काय म्हणालेले? संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे.राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. हे ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही त्य़ांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, ते देखील यावर चिंतन करत आहेत, असे प्रत्यूत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसच्या (Congress) राज्यातील नेत्यांना दिले होते.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस