शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला मोदी यांच्या 'बोगस अच्च्छे दिन' ला पर्याय हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 12:47 IST

भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : भारतीय घटनेवर तिरस्कार, दुही आणि हिंसा पसरविणाऱ्या शक्तींनी आक्रमण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बोगस अच्छे दिन'च्या सरकारला जनता पर्याय शोधत असून काँग्रेसला ही संधी साधायची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हटविण्यासाठी देशातील जनता काँग्रेस आणि आघाडीमधील पक्षांकडे आशेने पाहत आहे. लोकांना उद्भवत असलेल्या समस्या एेकणारे आणि त्यावरील उपायांद्वारे गरीबी, बेरोजगारी आणि असमानता कमी करणारे सरकार त्यांना हवे आहे. चांगले जगण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी शेतकरी व युवकांना काँग्रेसच पर्याय दिसत आहे. दुहीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो, असेही राहुल यांनी सांगितले. मोदी यांचे सरकार भ्रष्टाचार, आर्थिक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. ते देश चालिवण्यास असमर्थ आहेत. या सरकारला हटविण्यासाठी व जनतेला हवे असलेले सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतील, असे राहुल गांधी म्हणाले. भाजप आणि आरएसएस जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाची शक्तीस्थाने असलेल्या संस्थांवर हल्ले करण्यात आले आहेत. आधुनिक भारतामध्ये या संस्थांना लोकशाहीची मंदिरे म्हणून ओळखले जाते. या शक्ती ती उद्धवस्त करत सुटली असल्याचा आरोप राहुल यांनी केला.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी