शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महाराष्ट्राचीच; 'त्या' वक्तव्याला कशाचाही आधार नाही; अजित पवारांनी कर्नाटकला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 13:11 IST

बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

"मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार", असं प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान त्यांच्या जनतेला खूश करण्यासाठी केलं असावं, कर्नाटकचा मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विधानाला कशाचाही आधार नाही, असं अजित पवार म्हणाले. 

"महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला", असं अजित पवार म्हणाले. 

असे येडे बरळत असतात; संजय राऊत यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला. "असे येडे बरळत असतात. त्यांनी जरा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करावा", असा टोला संजय राऊत यांनी लक्ष्मण सवदी यांना लगावला. यासोबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आहेत हे कर्नाटकने लक्षात ठेवावं, असा थेट इशाराही राऊत यांनी दिला आहे.  

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाकडे आमचं लक्षकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वच राज्यांचं लक्ष असतं. त्यामुळे राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझंही अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात वंचित आणि गरीब वर्गाला दिलासा मिळायला हवा, अशी आशा आम्हाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे डोळे अर्थसंकल्पाकडे लागलेले असतात. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसलेला असला ही वस्तुस्थिती जरी असली तरी देशाच्या जनतेवर जास्तीचं ओझं देऊनही चालणार नाही, असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत