शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

VIDEO: "तुला जेलमध्येच टाकणार"; संसदेत शिवसेना खासदाराने धमकी दिल्याचा नवनीत राणांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 23:58 IST

mp navneet rana writes to lok sabha speaker alleging shiv sena mp arvind sena threatened her:

नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या, पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा घटनांच्या मालिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. आता यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. (mp navneet rana writes to lok sabha speaker alleging shiv sena mp arvind sena threatened her)नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत भाषण करताना ठाकरे सरकारवर सवाल उपस्थित केले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप राणा यांनी केला आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेले परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा संसदेत गाजला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सिंग यांनी पत्रात केला होता. त्यावरून भाजपच्या खासदारांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधलं. अपक्ष खासदार नवनीत राणांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच खंडणी वसुली होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.ठाकरे सरकारवर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा दावा राणा यांनी केला. सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी राणा यांना धमकी का देईन? मी त्यांना धमकी दिली की नाही, हे तिथे उपस्थित असलेले लोकदेखील सांगू शकतील. राणा यांची देहबोली आणि त्यांचे शब्द चुकीचे होते, असं सावंत म्हणाले. त्यावर मी कसं आणि काय बोलायचं हे ते मला सांगणार का, असा सवाल राणा यांनी विचारला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझेAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरे