शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘दुनिया में सबसे जादा मीडिया से डर लगता है’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 10:53 IST

Bhagat Singh Koshyari: ‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे. त्यांच्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून प्रारंभ झाला.

नांदेड : ‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे. त्यांच्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हे वक्तव्य केले. दिवसभर त्यांचे भरगच्च कार्यक्रम होते. विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांनी श्री गुरुगोविंदसिंघ अध्यासन केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले, मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडते. लोकांमध्ये गेलो तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. नियोजनात नसलेल्या गणित संकुलाची इमारत पाहण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. नंतर त्यांनी रेन हार्वेस्टिंगची पाहणी केली. रेन हार्वेस्टिंगला मदतीसाठी मी राज्य सरकारला सूचित करतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांनी विद्यापीठ परिसरातील जलपुनर्भरण योजनेचीही पाहणी केली.  वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन आणि पाहणी दौरा राज्यपालांनी टाळला.  

मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही, जनतेच्या विकासाचे जे तीन डेव्हलपमेंट बोर्ड आहेत त्याचे अधिकार मला संविधानाने दिले आहेत, मी जिथे जातो तिथे दोन-तीन अधिकाऱ्यांना बोलावून त्याबाबत चर्चा करतो, तशीच चर्चा आज केली.     - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल 

गुरुद्वाराचे पायऱ्यांवरूनच घेतले दर्शन विद्यापीठातील कार्यक्रम आटोपल्यानंतर राज्यपाल सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. मात्र, धार्मिकस्थळ बंद असल्यामुळे गुरुद्वाराच्या पायऱ्यांवरूनच त्यांनी दर्शन घेतले. तिथे त्यांनी गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कोश्यारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण