शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 05:15 IST

वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई : पुलवामा हल्ल्याशी संबंधित किंवा गेल्या पाच वर्षांत आणलेल्या योजनांसंदर्भात नेमक्या बातम्या, आकडेवारी जनतेसमोर येऊ द्यायची नाही. अशा घटना आणि योजनांच्या माध्यमातून स्वत:ला पोषक वातावरण निर्माण करायचे, असा धंदा भाजपने सुरू केला आहे. ही आणीबाणीच्या पुढची परिस्थिती आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.भांडुप येथे बुधवारी मनसेची सभा झाली. या वेळी त्यांनी मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांना खोटे बोलण्याचा रोग जडलाय, अशी बोचरी टीकाही केली. नोटाबंदी, जीएसटी ही फसलेली धोरणे आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.साध्वी प्रज्ञा सिंह हिला तिकिट देऊन भाजपवाले तिच्या कृत्याचे समर्थनच करीत आहेत. त्या बाईला सिग्नल तोडला म्हणून अटक केली नव्हती, तर ती बॉम्बस्फोटाची केस होती. दहशतवादाला कुठलाही धर्म नसतो. मरणारी माणसे कोणत्या धर्माची आहेत, हे बॉम्बला माहीत नसते. त्यामुळे दहशतवाद्यांना पाठीशी घालू नका, असेही राज म्हणाले.मोनिका मोरेही स्टेजवररेल्वे अपघातात दोन्ही हात गामवलेल्या मोनिका मोरे हिला देखील स्टेजवर आणण्यात आले. तिला कुठलीही राजकीय मदत न करता केवळ जाहिरात करण्यात आल्याचे सांगत राज यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निषाणा साधला. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड आहे, अशी बोंब इथले खासदार किरीट सौमय्या यांनी २०१४ पूर्वी ठोकली होती. २०१४ नंतर मोदी सरकार सत्तेत आल्यावर सौमय्या गप्प का? असा सवाल राज यांनी सभेतून उपस्थित केला.‘पंतप्रधानांच्या गावी शौचालयच नाही’मोदी यांच्या विविध योजनांचा व्हिडिओतून पोलखोल करत राज यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांसह त्यांच्या स्वत:च्या गावाची दुर्दशा दाखवली. मोदींच्याच गावात महिलांना उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्या गावात शौचालयेच नाहीत. हा माणूस जिथून आला त्या गावाची परिस्थिती अशी असेल, तर तो देश का बदलेल? अशी टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला