शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी-शहांना भजी तळायला लावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 07:05 IST

हुकूमशहांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन

पुणे/सांगली : तरूणांना समोसे आणि भजी तळा म्हणणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मतदारांनी सत्तेवरून खाली खेचून, समोसे आणि भजी तळायला लावावे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाºया आणि हुकूमशाही आणू पाहणाºया व्यक्तींना घरी बसविण्याचे आवाहन त्यांनी केले.

चव्हाण म्हणाले, सबका साथ आणि सबका विकास असे म्हणणाºया भाजपने केवळ स्वत:च्या पक्षाचा विकास केला. त्यातून जमविलेल्या संपत्तीतून निवडणूक लढवीत आहेत. संविधान जाळण्यापर्यंत मजल गेलेल्या मोदी आणि शहा या हुकूमशहांना घरी बसवून लोकशाही टिकविण्यासाठी महाआघाडीला मतदारांनी साथ दिली पाहिजे.
राज्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. दोन वर्षांपासून ते अभ्यासच करीत आहेत. आता अभ्यास कसला करता, तुम्ही नापास झाला आहात. तुम्हाला घरी बसावे लागेल. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, जाती,धर्माच्या नावावर कोणी निवडून येता कामा नये. लोकसभेच्या पहिल्या पायरीवर डोके ठेवणाऱ्यांनी प्रत्यक्ष संसदेत हुकुमशाही सुरू केली. अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसविण्याचे पाप मोदींनी केले. सांगलीतही अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचारसभा घेतली.‘मोदींना लाज कशी वाटत नाही’शहीद जवानांचा अवमान करणाºया उमेदवाराची मोंदी पाठराखण करीत आहेत. निवडणूक हातातून जात असल्याचे दिसत असल्याने धार्मिक धु्रवीकरण करून देशात तेढ निर्माण करणाºया मोदींना मते मागताना लाज कशी वाटत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींचा समाचार घेतला.भाजपने वसंतदादांचा पुतळा झाकलासांगली स्टेशन चौकात भाजपच्या सभेवेळी वसंतदादा पाटील यांचा पुतळा झाकण्यात आला होता. त्यावर विशाल पाटील म्हणाले की, दादांचा पुतळा झाका, फोटो काढून टाका. पण त्यांचे विचार जनतेच्या मनात रूजले आहेत, ते कसे काढणार? हाच धागा पकडत अशोक चव्हाण म्हणाले की, वसंतदादांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जन्मशताब्दी शासनाने साजरी करायला हवी होती. पण त्यांचे पुतळे झाकण्याचे काम भाजपने केले. त्यांना लाज कशी वाटत नाही?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीAshok Chavanअशोक चव्हाण