"कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:16 PM2021-03-16T12:16:43+5:302021-03-16T12:17:54+5:30

mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus: मनसेचा ठाकरे सरकारला सवाल; प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांना विरोध

mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus | "कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?"

"कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?"

Next

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे. (mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus)

राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...

'महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?', असे प्रश्न देशपांडेंनी ट्विट करून विचारले आहेत. राज्य सरकारकडून जनतेला कोरोनाची नाहक भीती दाखवली जात असल्याचा आरोप मनसेकडून अनेकदा करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मास्क वापरणार नसल्याची भूमिका घेतली आहे.



तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोना नाही. मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर प्रेम आहे की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेनं राज्य सरकारवर केली आहे.  सरकार एवढे कडक निर्बंध लावत असेल, तर जनतेला काही सवलती देणार का? असाही प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, 'या' व्यक्तींना राज ठाकरेंचं आवाहन

रुग्ण संख्या कमी झाल्यावर आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न अन्...
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या 'वरळी पॅटर्न'चं कौतुक करायचं आणि रुग्ण संख्या वाढल्यावर लोकांना बेजबाबदार म्हणायचं, अशा शब्दांत मनसेकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला. सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांना घाबरवायचं काम करत आहे. लोकांनी कामं करायची नाहीत का?, असा प्रश्न मनसेनं सरकारला विचारला आहे.

Web Title: mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.