कुंथत कुंथत सरकार चालत नाही; ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा टोला

By कुणाल गवाणकर | Published: October 29, 2020 04:14 PM2020-10-29T16:14:51+5:302020-10-29T16:19:07+5:30

Raj Thackeray meets governor bhagat singh koshyari: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

mns chief raj thackeray slams thackeray government over decision making capacity | कुंथत कुंथत सरकार चालत नाही; ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा टोला

कुंथत कुंथत सरकार चालत नाही; ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा टोला

Next

मुंबई: कुंथत कुंथत सरकार चालत नाही. हे कशासाठी इतके कुंथत आहेत, तेच मला कळत नाही, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. पण रेल्वे सेवा सुरू नाही. रेस्टॉरंट, हॉटेल सुरू आहेत. पण मंदिरं खुली करण्यास परवानगी नाही. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात प्रश्नांची कमतरता नाही. पण निर्णयांची कमतरता आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. 'राज्यात अनेक प्रश्न आहेत. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. रेल्वे महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र इतरांसाठी त्या बंदच आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना रेल्वे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. हॉटेल्स सुरू करण्यास मुभा आहे. पण मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी नाही. या धरसोड वृत्तीमागचं कारण अद्याप मला समजलेलं नाही. सरकारनं एकदा नीट विचार करून काय सुरू काय बंद याची माहिती लोकांना द्यावी,' असं राज ठाकरे म्हणाले. 

“प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट

राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे वाढलेल्या वीज बिलांचा प्रश्न मांडला. 'वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचं म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारनं तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं. पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यात भरमसाठ वीजबिल येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."

लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय. लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितलं.

Web Title: mns chief raj thackeray slams thackeray government over decision making capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.