शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 13:52 IST

sunil kedar : सुनील केदार यांनी नागपुरातील पाटणसावंगी गावातील  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांच्यावर संबधित महिलेने केलेल्या आरोपांवर सुनील केदार यांनी आपली भूमिका मांडली. 

नागपूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर आता राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही प्रतिक्रिया दिली असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे आहे. 

सुनील केदार यांनी नागपुरातील पाटणसावंगी गावातील  ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. पाटणसावंगीतील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर संबधित महिलेने केलेल्या आरोपांवर सुनील केदार यांनी आपली भूमिका मांडली. 

"धनजंय मुंडे यांच्याबाबत चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे. भाजपा आमदार राम कदम यांनी दांडीयाच्यावेळी केलेले वक्तव्य बघावे. धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी करत आहे", असे सांगत सुनील केदार यांनी भाजपावर निशाणा साधला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारीला फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणाला वेगळं वळणमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला ही ब्लॅकमेलर आहे, तिने आमच्यासोबतही अशाचप्रकारे हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांनीही महिला ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, तिने माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केलेल्याचे अनेक मेसेज आहेत असा दावा केला होता, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

धनंजय मुंडेंचा तूर्तास राजीनामा नाहीगुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामा यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे समजते. पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच, मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.  

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा