शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

Kirit Somaiya: किरीट सोमय्या मागे लागताच, मिलिंद नार्वेकरांनी दापोलीतील बंगलाच जमीनदोस्त केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 09:45 IST

Milind Narvekar illegal bungalow: मुरूड येथील समुद्रकिनारी हा बंगला बांधण्यात आला हाेता. समुद्रकिनाऱ्याजवळील ७२ गुंठे जागेत ५०० स्क्वेअर फुटांमध्ये बंगल्याचे बांधकाम सुरू केले हाेते. हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा दावा किरीट साेमय्या यांनी केला हाेता.

लाेकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भाजप नेते किरीट साेमय्या (Kirit Somaiya) यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा दापाेली तालुक्यातील मुरूड येथे बांधलेला आलिशान बंगला रविवारी जमीनदाेस्त करण्यात आला. मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:हून या बंगल्याचे बांधकाम बुलडाेझर लावून ताेडून टाकले. (Shivsena Leader, CM Uddhav Thackeray's PA Milind Narvekar demolished his bungalow in Dapoli .)

दापाेली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनारी मिलिंद नार्वेकर यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून आलिशान बंगला बांधल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केली हाेता. त्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा प्रशासनापासून ते केंद्र सरकारपर्यंत तक्रारही दाखल करण्यात आली हाेती.

दापाेलीत येऊन पाहणी करणार : साेमय्यामिलिंद नार्वेकर यांनी स्वत:हून हा बंगला पाडल्याची माहिती किरीट साेमय्या यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी अखेर अनधिकृत असलेला हा बंगला मिलिंद नार्वेकर यांना पाडावा लागल्याचे म्हटले आहे. हा बंगला पाहण्यासाठी आपण स्वत: दापाेलीला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

५००० स्क्वेअर फुटांमध्ये बंगलामुरूड येथील समुद्रकिनारी हा बंगला बांधण्यात आला हाेता. समुद्रकिनाऱ्याजवळील ७२ गुंठे जागेत ५०० स्क्वेअर फुटांमध्ये बंगल्याचे बांधकाम सुरू केले हाेते. हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा दावा किरीट साेमय्या यांनी केला हाेता.या प्रकरणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल येथे खटला सुरू हाेता. जिल्हा किनारा मॅनेजमेंट कमिटी आणि महाराष्ट्र काेस्टल झाेन ऑथाॅरिटीकडून नाेटीसही बजावण्यात आली हाेती. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार की अभय मिळणार, याकडे लक्ष लागले हाेते. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना