शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

Farmer Protest: कुत्रा मेला तरी शोक, पण 250 मृत आंदोलक शेतकऱ्यांचे काय?; राज्यपाल सत्यपाल मलिकांची उघड नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 2:14 PM

Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. सत्यपाल मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले.

झुंझुनूं : एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) बाजुने विरोधकांसह कोणीही बोलायला तयार नाहीय. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नाहीय. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसले आहेत. यावर मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik ) यांनी मोठे विधान केले आहे. झुंझुनूंच्या एका खासगी कार्यक्रमामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या वागणुकीविरोधात उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. (Meghalaya Governor Satyapal Malik angry on Central government silent on Farmers Death in Potest. )

पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, शेतकरी आंदोलन एवढा दीर्घ काळ सुरु राहणे कोणाच्याच हिताचे नाहीय. कुत्रा मेला तरी आमच्या नेत्यांचा शोक संदेश येतो. मात्र, 250 शेतकरी या आंदोलनात मृत झाले त्यांच्याबाबत कोणी चकार शब्द काढत नाही. माझ्या आत्म्याला हीच गोष्ट दु:ख देतेय. तोडगा निघणारच नाही असे हे प्रकरण नक्कीच नाहीय, हे आंदोलन संपू शकते, अशा शब्दांत सत्यपाल मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. देशभरातील शेतकऱ्यांमध्ये हा मुद्दा बनला आहे. अशावेळी तो लवकर सोडविणे हिताचे आहे. मी घटनात्मक पदावर बसलोय. दलालाचे काम करू शकत नाही. मी फक्त शेतकरी नेते आणि सरकारच्या लोकांना सल्ला देऊ शकतो, माझे केवळ एवढेच काम आहे, असेही त्यांना सांगितले. 

मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले. शेतमालाला योग्य भाव न मिळण्याचा मुद्दा आजचा नाहीय. ब्रिटिशांच्या काळात मंत्री राहिलेल्या छोटूराम आणि व्हाईसरॉय यांच्यातील एक किस्सादेखील सांगितला. दुसऱ्या महायुद्धावेळी व्हाईसरॉय मंत्री छोटूरामना भेटायला गेले आणि त्यांनी अन्नधान्याची मागणी केली. तेव्हा छोटूराम यांनी त्यांना मी तुम्हाला अन्नधान्य कितीला द्यायचे याचा दर ठरविणार असल्याचे सांगितले. यावर व्हाईसरॉय यांनी सैन्याला पाठवून शेतकऱ्यांकडून धान्य घेईन अशी धमकी छोटूरामना दिली. यावर छोटूराम यांनी व्हाईसरॉयना कड्या शब्दांत उत्तर दिले. ''एकवेळ धान्याला आग लावा, परंतू तुम्हाला कमी किंमतीत गहू देऊ नका, असे मी शेतकऱ्यांना सांगेन'' अशा शब्दांत सुनावत कमी किंमतीत धान्य देण्यास नकार दिला होता. 

केंद्र सरकारने किमान हमी दराची शाश्वती द्यावी...

शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. त्या देशाला वाचवले जाऊ शकत नाही. त्यामुळे लष्कर आणि शेतकरी समाधानी ठेवले गेले पाहिजेत, असे सांगून मलिक यांनी शेतकऱ्यांना दुखवू नका’, असे  दोन दिवसांपूर्वीच  मोदी आणि शहा यांना मलिक यांनी आवाहन केले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार