शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

उत्तर पूर्व मुंबईत मुख्यमंत्री, राज यांची एकाच दिवशी सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 06:35 IST

उत्तर पूर्व मुंबईतील मराठी फॅक्टर लक्षात घेत, भांडुपमध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतील मराठी फॅक्टर लक्षात घेत, भांडुपमध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सेनेची मते मिळविण्यासाठी उद्धव ठाकरेंची सभाही घेण्याच्या तयारीत महायुतीचे उमेदवार आहेत. याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीची सभाही पार पडणार आहे.गेल्या निवडणुकीत ‘आप’च्या मेधा पाटकर रिंगणात होत्या. या वेळी बहुजन वंचित आघाडी रिंगणात आहे. मानखुर्द शिवाजीनगर, विक्रोळी, घाटकोपर पश्चिमेकडील भागात, दलित, मुस्लीम लोकवस्ती अधिक आहे. मोदी लाट असतानाही मानखुर्द शिवाजीनगर भागातून आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांनी २० हजारांच्या मतांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे ही मते आपल्या बाजूनेच राहावी म्हणून त्यांनी फिल्डिंग लावली आहे. याच भागात शिवाजीनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी शरद पवारांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर विक्रोळीच्या कन्नमवारनगर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार नेहारिका खोंदले यांच्यासाठी जाहीर सभा पार पडणार आहे. यात, बाळासाहेब आंबेडकर, असदुद्दिन ओवेसी, रेखा ठाकूरसह खोंदले या प्रमुख वक्त्या असणार आहेत. नेहारिका यांची राजकीय पार्श्वभूमी जरी नसली तरी, या सभेमुळे दलित, मुस्लीम मते काही प्रमाणात त्यांच्या बाजूने फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यापाठोपाठ उत्तर पूर्व मुंबईत सर्वाधिक म्हणजे ७ लाख मराठी मतदार आहेत. याच मराठी फॅक्टरला केंद्रस्थानी ठेवत २४ एप्रिल रोजी भांडुपच्या खडीमशीन परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्यासाठी सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाटकोपरमध्ये सभेसाठी असणार आहेत. गुजरातमधील खासदार पुरुषोत्तम रूपाला यांचीही सभा मुलुंड, घाटकोपर परिसरात होणार आहे. विशेषत: गुजराती मतदार लक्षात घेत, या भागात रूपाला यांची सभा पार पडणार आहे. त्यापाठोपाठ भाजपविरोधी नाराज शिवसैनिकांची मते जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठीही भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे या सभांमुळे मतदारांचा कौल कुणाकडे आणि किती प्रमाणात फिरेल हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाmumbai-north-east-pcमुंबई उत्तर पूर्व