शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

Nusrat Jahan: मी, नुसरता जहाँ रुही जैन...! भर संसदेत खोटी शपथ घेतली; भाजपाचा 'लाव रे तो Video'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:30 IST

Nusrata Jahan reject Marriage with Nikhil jain: तृणमूल खासदार नुसरत जहाँ रुही जैन यांचे हे खासगी आयुष्य आहे. त्या कोणासोबत लग्न करतात, कोणासोबत राहतात याच्याशी कोणाचा काही संबंध असता नये, असे भाजपाने म्हटले आहे. प्रेग्नंट असलेल्या नुसरत समोर आता नवीन अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Nusrata Jahan nikhil jain marriage issue: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदारनुसरत जहाँ (Nusarat jahan) उद्योगपती निखिल जैनसोबत ( Nikhil jain) लग्नच मान्य नसल्याचे सांगून वादात अडकली आहे. प्रेग्नंट असलेल्या नुसरत समोर आता नवीन अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नुसरत जहाँचीखासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Nusarat jahan take oath in Parliament name of ruhi jain, now says invalid marriage with Nikhil jain.)

अमित मालवीय हे भाजपाचे आय़टी सेल प्रमुख आहेत. त्यांनी नुसरत जहाँच्या निखिल जैनसोबत लग्न मान्य नसल्याच्या वक्तव्यावर ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तृणमूल खासदार नुसरत जहाँ रुही जैन यांचे हे खासगी आयुष्य आहे. त्या कोणासोबत लग्न करतात, कोणासोबत राहतात याच्याशी कोणाचा काही संबंध असता नये. परंतू त्या एक लोकप्रतिनिधी आहेत. मग अशावेळी भर संसदेत नुसरत जहाँ यांनी निखिल जैनसोबत लग्न केल्याची घोषणा केली होती. हे संसदेच्या रेकॉर्डवर आले आहे. आता त्या लग्न नाकारत आहेत. मग त्या संसदेत खोटे बोलल्या का? असा सवाल उपस्थित केला आहे.  

नुसरत जहाँ यांनी संसदेत शपथ घेण्याआधी हे लग्न केले होते. यानंतर त्या सपथ घेत असताना सलाम वालेकुम नमस्कार असे म्हणत मी, नुसरता जहाँ रुही जैन....अशी शपथ घेतली होती.  बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. नुसरत जहाँ हिने २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन याच्याशी विवाह केला होता. नुसरत जहाँ हिने स्वत:च आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र आता नुसरत जहाँ ही हा विवाह वैध नसल्याचे सांगत आहे. गेल्या काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या सहा महिन्यापासून आपण एकत्र राहत नसल्याचे नुसरतचा पती निखिल याने सांगितले आहे. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना निखिलने याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे तसेच ती गर्भवती असेल तर ते मुल त्याचे नसल्याचे सांगितले.

तुर्कस्तानचा आसरा...नुसरत जहाँ हिने या प्रकरणी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणाली की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. त्याशिवाय हा एक Interfaith Marriage (दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह) असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. कायदेशीररीत्या हा विवाह वैध नाही आहे. तर हे केवळ एक नाते किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे त्यातून बाजूला होण्यासाठी घटस्फोट घेण्याची गरजच नाही, असे तिचे म्हणणे आहे. 

टॅग्स :nusrat jahanनुसरत जहाँParliamentसंसदMember of parliamentखासदारBJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल