शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मावळ लोकसभा : बड्या नेत्यांच्या सभांऐवजी संवादावर उमेदवारांचा भर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 7:27 PM

मावळ मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे पार्थ पवार यांचे भवितव्य २९ एप्रिलला मतपेटीत बंद होणार आहे.

ठळक मुद्देमावळ लोकसभा : झोपडपट्टीबहुल असलेला संमिश्र मतदारसंघपिंपरी विधानसभा मतदारसंघ थेट रिपोर्ट

नारायण बडगुजरपिंपरी : मावळ लोकसभेच्या  प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. कोणतीही मोठी सभा येथे घेण्याऐवजी उमेदवारांनी थेट संवादावर भर दिला आहे. महायुती, महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडीकडेही येथील मतदारांचे लक्ष आहे. झोपडपट्टीबहुल भाग असला, तरी प्राधिकरणासह काही भाग नव्याने विकसित झाला असल्याने हा मतदारसंघ संमिश्र आहे. त्यामुळे २००९ मध्ये राष्ट्रवादी, तर २०१४ मध्ये शिवसेनेचा विजय झाला.     पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे.  महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाईसाठी बराच कालावधी गेला. मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी या काळात राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर बारणे यांनीही वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. वंचित बहुजन आघाडीबाबतही येथील मतदारांत उत्सुकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे सहा लाख दलित व मुस्लिम मते आहेत. त्यातील सुमारे दीड लाख मते पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत. ...............युती । प्लस पॉइंट काय आहेत?मतदारसंघात शिवसेनेसह भाजपा आणि आरपीआयनेही (आठवले गट) प्रचारासाठी यंत्रणा कामाला लावली आहे़ मतदारसंघात आमदार शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडून आणि भाजपा नगरसेवकांकडून कोपरा सभांवर भर देण्यात येत आहे........................युती । वीक पॉइंट काय आहेत?मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यातच शिवसेनेचे केवळ चारच नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यासाठी त्यांची भाजपावर मदार आहे. ....................आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?

पिंपरी विधानसभेतून पहिला आमदार राष्ट्रवादीचा झाला होता. तसेच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले बडे पदाधिकारी या मतदारसंघात आहेत. त्यांना महाआघाडीने गळ घातली आहे. महाआघाडीचे एकदिलाने काम सुरू आहे................आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?विधानसभेचा हा मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे मागासवर्गीय मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांचे वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये मोठे विभाजन होऊ शकते. त्याचा फटका महाआघाडीला बसू शकतो.  ..................    मागच्या निवडणुकीत़़़२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी ५१,०९६ मते मिळवीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे (४८,७६१ मते) यांचा पराभव केला होता़...............मागच्या दोन लोकसभांमध्ये काय होता निकाल?2009च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ५७,२८९, राष्ट्रवादीला ५२,५०१ तर बसपाला ५०३३ मते मिळाली होती. अपक्ष मारुती भापकर यांना ३९५० मते मिळाली होती. ४७८८ मताधिक्य शिवसेनेला होते.....................2014च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभेतून शिवसेनेला ९५,८८९ मते मिळाली होती, तर शेकापला ३८,३५९ मते होती. तिसºया क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीला २१,०७१ मते मिळाली होती.विधानसभेचा हा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाले होते.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्यापुरुष - 1,79,808महिला - 1,61,889तृतीयपंथी - 4

एकूण - 3,41,701 

रील्ल३ ा१ङ्मे े८ ्रढंि

टॅग्स :mavalमावळmaval-pcमावळPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस