शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: भाजपमधील मराठा नेते करणार राज्यभर दौरे, विनायक मेटे यांची मराठा आरक्षणासाठी मोर्चाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:58 IST

Maratha Reservation: महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कमी पडल्याची बाब जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपमधील मराठा समाजाचे दौरे राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाणार आहेत.

मुंबई - महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात कमी पडल्याची बाब जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपमधील मराठा समाजाचे दौरे राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाणार आहेत. राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे हे या आधीच राज्याचा दौरा करीत आहेत. भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी मोर्चा काढण्याची तयारी चालविली आहे.माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण तसेच नरेंद्र पाटील हे नेते जिल्हावार दौरे करणार आहेत. पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, बीड, पुणे, ठाणे, सातारा, औरंगाबाद, जालना, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये हे नेते स्वतंत्रपणे जातील.दुसरीकडे भाजपमधील काही मागासवर्गीय नेत्यांना पदोन्नतीतील आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने कसे टिकवले होते आणि महाविकास आघाडी सरकारने ते कसे रद्द केले, हे समाजात जावून सांगण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीत सर्व मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. ओबीसींसाठीच्या समितीतील सर्व मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत; मात्र मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीत बिगर मागासवर्गीय मंत्र्यांचा भरणा आहे, याकडे भाजपचे मागासवर्गीय नेते लक्ष वेधणार आहेत. 

जबाबदारीचे वाटपभाजपमधील काही मागासवर्गीय नेत्यांना पदोन्नतीतील आरक्षण फडणवीस सरकारने कसे टिकवले होते आणि आघाडी सरकारने ते कसे रद्द केले, हे समाजात जावून सांगण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPoliticsराजकारणBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र