शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..."

By प्रविण मरगळे | Published: November 14, 2020 12:56 PM

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला.

ठळक मुद्देअनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्वाचं असतं, मुंबईत अनेक अनाधिकृत बांधकामे आहेतअभिनेत्रीच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली, ती आम्ही केली नाहीकोणालाही काही उखडायचं असेल तर उखडावं, त्यामुळे महिलेचा सन्मान करणं आमचं काम आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या अनाधिकृत कार्यालयावर मुंबई महापालिकेने जेसीबी फिरवला होता, या कारवाईविरोधात कंगनानं उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते, कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वादामुळेच मुंबई महापालिकेने तत्परतेने कारवाई केली असा आरोप विरोधकांनी केला होता, या संपूर्ण प्रकरणात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ‘उखाड दिया’ अशा हेडिंगने बातमी दिली होती.

कॉमेडियन कुणाल कामराच्या कार्यक्रमात या हेडिंगवरुन संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर संजय राऊत यांनी कंगनाचं नाव घेता तिला फटकारलं, राऊत म्हणाले की, अभिनेत्रीच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली,ती कारवाई आम्ही केली नाही, परंतु सामनाची स्वत:ची स्टाईल आहे, हेडलाईन वेगळी असते. कंगना राणौत म्हणाली होती, मी मुंबईत येतेय, कोणालाही काही उखडायचं असेल तर उखडावं, त्यामुळे महिलेचा सन्मान करणं आमचं काम आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला.

तसेच अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी खूप महत्वाचं असतं, मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत, स्टुडिओपण अनधिकृत कामं आहेत, एक फिल्मी डायलॉग आहे “जिनके घर शिशे के होते है वो दुसरो के घरपर पत्थर नही फेका करते” त्यामुळे आमच्याकडे दगड(पत्थर) आहेत, ते बाहेरून फेकू शकतो आणि आतमधूनही फेकू शकतो. जर तुम्ही काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, काही चुकीची काम लपवण्यासाठी गप्प बसावं, आमच्यावर दगडं फेकू नयेत, आम्ही तुम्हाला अनेकदा मदत केली आहे असा इशारा संजय राऊत यांनी कंगना राणौतला दिला आहे.

“हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

सुशांत बिहारचा नव्हे तर मुंबईचा मुलगा

सुशांत सिंग राजूपतला मी बिहारचं मानत नाही, तो मुंबईचा आहे, मुंबईत येऊन सुशांतची ओळख निर्माण झाली, सुशांत आमचा मुलगा आहे, त्याच्यासोबत चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ, किंचाळूच चुकीचं बोलणं खरं होत नाही. जे सत्य असते ते शांतपणेही त्याचं काम सुरु ठेवतं. जे सत्य आहे ते लपवून नवीन काही शोधायचं प्रयत्न सुरू होता असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

“या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"

तसेच सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची तुम्हाला कोणाची ऑर्डर होती का? ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का? मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो शतप्रतिशत खरा होता, जगातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचा समावेश आहे. वर्दीचा सन्मान राखला पाहिजे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणता आणि त्यांच्याच सुरक्षेत फिरता, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, शरद पवारांविरोधात बोलतात, त्या व्यक्तींसोबत पोलिसांनी राहू नये हे आम्ही बोललो नाही. पोलीस त्यांचे काम करतात, त्या व्यक्तीची सुरक्षा करणे हे सरकारचं काम आहे असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKangana Ranautकंगना राणौतMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv Senaशिवसेना