शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

Mansukh Hiren case: मनसुख हिरेन प्रकरणात फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले धनंजय गावडे आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:55 IST

Mansukh Hiren case: मनसुख हिरेन यांना मृत्यूपूर्वी धनंजय गावडे भेटल्याचा दावा फडणवीसांनी केला

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर कार मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्यानं प्रकरणाला नवं वळण लागलं. यानंतर आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. मनसुख हिरेन मृत्यूपूर्वी धनंजय गावडेंना भेटले. त्या ठिकाणापासून ४० किलोमीटर अंतरावर हिरेन यांचा मृतदेह सापडला, असा दावा फडणवीस यांनी केला. (Devendra Fadnavis makes serious allegations on Dhananjay Gawade)महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

विधानसभेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे २०१७ चा एफआयआर. यानुसार दोन व्यक्तींनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे (Dhananjay Gawade) आणि दुसरा सचिन हिंदुराव वाझे (Sachin vaze). मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे यांच्या ठिकाणी आहे. गावडे यांच्या घरापासून ४० किलोमीटर अंतरावर हिरेन यांचा मृतदेह सापडला. त्यांनी गावडेच्या ठिकाणी जाण्याचं कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत?, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.धमक्या देता का? माझी चौकशी करा! फडणवीस संतापले; देशमुख, पटोलेंना एकटे भिडले

धनंजय गावडेंचं शिवसेनेशी नेमकं काय कनेक्शन?देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत धनंजय गावडे आणि सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले. हे दोघे एका पक्षाशी संबंधित असल्यानं त्यांना पाठिशी घातलं जातंय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न विचारून फडणवीसांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला."मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोप

धनंजय गावडे कोण आहेत? धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत. त्यांनी पालिकेत गटनेता, स्थायी समिती सदस्य ही पदं भूषवली आहेत. ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. गावडे हे २०१५ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ६३ मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

धनंजय गावडेंविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंदधनंजय गावडे अनेकदा वादात सापडले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, खंडणी आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. २०१८ मध्ये एका ३४ वर्षीय महिलेनं त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्याआधी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर काही बिल्डरांनी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. २०१६ मध्ये प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून ४० लाख रुपये हस्तगत करण्यात आले

नोटबंदीच्या काळात १ कोटींच्या नोटा सापडल्यानोटबंदीच्या काळात गावडे यांच्याकडे १ कोटी २२ लाख रुपये मूल्य असलेल्या नव्या नोटा सापडल्या होत्या. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि नालासोपारा गुन्हे शाखेनं त्यांना सापळा रचून रंगेहाथ अटक केली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMansukh Hirenमनसुख हिरणMukesh Ambaniमुकेश अंबानी