शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 8:24 AM

Mamata Banerjee Oath Ceremony: एकीकडे कोलकात्यात ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) तृणमूल काँग्रेसने (TMC) मोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव झाला आहे. यानंतर बंगालमध्ये हिंसाचार उफाळला होता. या साऱ्या राजकीय कोलाहलात ममता बॅनर्जी या आज सकाळी 10.45 वाजता राजभवनात शपथ घेणार आहेत. राजभवनात हा कार्यक्रम साधेपणाने केला जाणार आहे. (Mamata Banerjee will take oath of CM for Third time in Kolkata.)

एकीकडे कोलकात्यात ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP Chief) जे पी नड्डा (J.P. Nadda) हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत.कोरोना महामारी पाहता ममता बॅनर्जी यांनी शपथ समारंभाला 50 लोकांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आमि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचा समावेश आहे. 

शपथ ग्रहणाचा हा कार्य़क्रम 55 मिनिटांचा असणार आहे. यानंतर ममता थेट नबन्नायेथे जाार आहेत. तिथे ममतांना गार्ड ऑफ ऑनर दिले जाईल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल 213 जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्तेत आली आहे. भाजपाने 77 जागांवर विजय मिळविला आहे. यामुळे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा राहणार आहे. बंगाल विधानसभा निकालानंतर हिसाचार उफाळला होता. यावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारकडे अहवाल मागविण्यात आला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. तसेच हिंसा रोखण्यासाठी पाऊले उचलण्यास सांगितले होते. 

निकालानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होऊ लागले असून भाजपाचे जे पी नड्डा यांनी देशाच्या फाळणीवेळसारखी हिंसा असल्याची टीका केली आहे. हिसेविरोधात दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. नड्डा यांनी दक्षिण परगना आणि कोलकाताच्या बेलेघाटामध्ये हिसेत मृत झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. आज भाजपा देशभरात धरणे आंदोलन करणार आहे. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१