'सगळ्याच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करा', कर्नाटकात भाजपा नेत्याचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 13:02 IST2020-01-08T13:01:00+5:302020-01-08T13:02:20+5:30
कर्नाटकमधील भाजपाचे प्रवक्ता मधुसूदन यांनी मंत्रिपदाच्या नाट्यावर भाष्य करताना

'सगळ्याच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करा', कर्नाटकात भाजपा नेत्याचा संताप
बंगळुरू - कर्नाटक सरकारमध्येही मंत्रीपदाच्या वाटपावरुन राजी-नाराजीचे सूर उमटत आहेत. कर्नाटकमध्ये येडीयुरप्पा यांच्या नेृतत्वात भाजपाने सरकार स्थापन केले आहे. एचडी कुमारस्वामी हे बहुमताचा आकडा पार न करू शकल्याने भाजपाने सत्तास्थापनेचा दावा करत सरकर स्थापन केले. त्यानंतर, झालेल्या मंत्रिपदाच्या वाटपावरुन कर्नाटकात नाराजी नाट्य चांगलंच रंगलय.
कर्नाटकमधील भाजपाचे प्रवक्ता मधुसूदन यांनी मंत्रिपदाच्या नाट्यावर भाष्य करताना, सर्वच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केलीय. मधुसूदन यांची ही मागणी म्हणजे पक्ष नेतृत्वावर उपहासात्मक टीका आहे. मुख्यमंत्री फक्त एकच असायला हवा, पण इतर सर्वच मंत्र्यांना उपमुख्यमंत्री करा, कारण सगळ्याच मंत्र्यांची उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी लॉबिंग सुरू आहे, असे मधुसुदन यांनी म्हटले आहे. ग्रामविकासमंत्री के.एस ईश्वरप्पा आणि इतर मंत्रीही उपमुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग करत आहेत. उपमुख्यमंत्री पद हे चष्टेचा विषय बनलंय, असेही त्यांनी म्हटलं.
सध्या अश्वथ नारायण, गोविंद करजोल आणि लक्ष्मण सावदी हे तीन नेते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आहेत. पण, या नेत्यांनी भाजपाला सत्तेत आणण्यासाठी राजीनामा दिलेल्या 12 आमदारांनाही सरकारमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे म्हणत लवकरच 3 ते 4 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे मधुसूदन यांनी म्हटले आहे.