शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी कार्यालयाबाहेर गर्दी करणाऱ्यांवर मोठी कारवाई, आयोजकांसह ४३ नेते आणि १२० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 19:28 IST

Pankaja Munde: कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांची वर्णी न लागल्यामुळे नाराज झालेले मुंडे समर्थक मंगळवाऱी मुंबईत धडकले. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या वरळीतील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत येथे बैठक आयोजित करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांसह येथे जमलेल्या ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात मंगळवाऱी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Major action taken against those who crowded outside the office in support of Pankaja Munde, 43 leaders including organizers and 120 activists charged)

पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीतील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाबाहेर बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर, अहमदनगर अशा विविध भागातून अनेक कार्यकर्ते, राजकीय नेते येथे दाखल झाले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करत आपली भूमिका मांडली.

यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. शिवाय सोशल डिस्टसिंगचे नियम न पाळता विनामास्क सभा आयोजित केली. तसेच त्याठिकाणी उपस्थित राहिले म्हणून वरळी पोलीस पोलीस उपनिरिक्षक प्रदीप सोनावणे यांच्या फिर्यादीवरुन वरळी पोलिसांनी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात ४३ राजकीय नेते मंडळीसह १०० ते १२० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी १७ जणांना ताब्यात घेत नोटीस देत सोडून देण्यात आले आहेत. आयोजक तसेच सभेत उपस्थित असलेल्या सर्वाविरोधात हा गुन्हा दाखल असल्याचे वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल कोळी यांनी सांगितले. त्यानुसार तपास सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई