शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 19:13 IST

Vile Parle Assembly candidates: भाजपाने पराग अळवणी यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या दीपक सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबईMaharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपाची काल पहिली यादी जाहीर झाली. या यादीत सलग तिसऱ्यांदा आमदार अँड.पराग अळवणी  तिकीट दिले. त्यामुळे आपण येथून इच्छुक असताना अळवणी यांना तिकीट दिल्याने माजी आरोग्य मंत्री व शिंदे सेनेचे उपनेते डॉ.दीपक सावंत नाराज झाले आहेत.आपण आपली मानसिक तयारी केली असून, अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. लवकरच आपला निवडणूक अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'ला सांगितले.

जे.पी. नड्डांकडे केली होती जागेची मागणी

डॉ.दीपक सावंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची जागा शिंदे सेनेला मिळावी अशी मागणी  भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या कडे त्यांच्या मुंबई भेटीत केली होती.

३० जून २०२४ रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर निवडणुकीत ही जागा शिंदे सेनेची असतांना अखेरच्या क्षणी पदवीधर निवडणुकीसाठीचा आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला केली होती आणि तुमचे राजकीय पुनर्वसन करु असे आश्वासन भल्या पहाटे आपल्याला दिले होते.त्यामुळे त्याबदल्यात आता ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात यावी अशी आपली मागणी होती.मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

विलेपार्ले मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असून, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आपल्याला अपक्ष लढण्याची परवानगी द्यावी असे त्यांना पत्र देखिल दिले होते असे त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती

माजी आमदार डॉ.रमेश प्रभू यांच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण निवडणुक लढावी, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा होती,पण येन केन कारणाने आपल्याला पार्ल्यातून तिकीट नाकारण्यात आले व आपले तीन वेळा आमदार म्हणून विधानपरिषतून पुनर्वसन करण्यात आले.मात्र पार्ल्याचा शैक्षणिक,सांस्कृतिक विकास करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक लढण्याची आपली मनापासून इच्छा असल्याने आपण ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.

गेली ४० वर्षे या परिसरात शालेय जीवन, कॅालेज जीवन, वैद्यकीय व्यवसाय तसेच लायन्स,जायन्टस्,रोटरी मधे काम केले आहे, पार्ले टिळक, मिठीबाई, लोकमान्य सेवा संघ, उत्कर्ष मंडळ,साठ्ये महाविद्यालय ,जैन समाज , व्यापारी संघ अशा अनेक संस्थांशी आपला जवळचा संबंध आहे, त्यामुळे आपण येथून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकvile-parle-acविलेपार्लेdeepak sawantदीपक सावंतMahayutiमहायुती