शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha: तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:49 IST

Maharashtra Vidhan Sabha: विधानसभेत अनिल देशमुख आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये जुंपली; शेरोशायरीतून वार-पलटवार

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विविध विषयांवर ठाकरे सरकारची कोंडी केली. अधिवेशनाला सुरुवात होताच मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर विविध विषयांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहांमध्ये सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही. विधान परिषदेत देवेंद्र फडणवीस सरकारवर तुफान हल्लाबोल करत होते. त्यांना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी साथ दिली. वैधानिक विकास महामंडळावरुन ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी अडचणीत आणणाऱ्या मुनगंटीवार यांनी आज केलेल्या शायरीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुधीर मुनगंटीवार अडचणीत; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीरआज विधानसभेत विदर्भाच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एकमेाकांवर शेरोशायरीच्या माध्यमातून हल्ला चढवला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख गझल ऐकवत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसत होते.उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं- सुधीर मुनगंटीवारयानंतर मुनगंटीवार यांनी शेर सादर करत देशमुखांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असं मुनगंटीवार यांनी म्हणताच भाजपच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण सुधीर मुनगंटीवार यांनी हा शेर सादर केल्यानंतर विधानसभेत एकच चर्चा रंगली. तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, असं मुनगंटीवार का म्हणाले? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत का?, अशी उलटसुलट चर्चा विधानसभेत सुरू झाली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारAnil Deshmukhअनिल देशमुख