शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

“भास्कर जाधव म्हणजे कोकणातील दशावतारमधले नरकासूर अन् तमाशातले सोंगाड्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 10:56 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

ठळक मुद्देतालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केलाभाजपा आमदार नितेश राणेंची जहरी टीकामला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत.

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून आलं. सभागृह स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गोंधळावरून विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे.

या निलंबनाच्या कारवाईवरून भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी सरकारवर प्रहार केला. नितेश राणे म्हणाले की, आमचे १२ आमदार सैनिकासारखे लढले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून त्यांचे निलंबन करण्यात आले. आम्ही कोकणातले आहोत, भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) कोकणातले आहेत, कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली.

तसेच तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला आहे. या नरकासूरावर विश्वास ठेवायची गरज नाही. मला आश्चर्य वाटतं ते रडले नाहीत, स्वत:चे कपडे फाडले नाहीत. या सरकारकडून काही अपेक्षा नाही, ओबीसी आरक्षणावरून आमचे सहकारी लढले आहेत. कोकणातली माणसं भास्कर जाधव यांना चांगलेच ओळखतात. हा माणूस सोंगाड्या, नरकासूर आहे असं नितेश राणे म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात काय घडलं?

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले की, दहा मिनिटांसाठी सभागृह स्थगित केले. मी अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यांचे आमदार तिथे आले होते. सभागृह स्थगित झालेले असताना अशाप्रकारे ते माझ्यासमोर आले. सभागृहाचा विषय सभागृहात थांबायला हवा होता. परंतु ते काही झालं नाही. त्यांनी वैयक्तिक घेण्याची गरज नव्हती. ते सगळे माझ्या तुटून पडले, मला शिवीगाळ केली, आई बहिणीवर शिव्या दिल्या. अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितले. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यानंतर काही नेत्यांनी मध्यस्थीकडून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असं कधीच घडलं नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलं. छगन भुजबळांनी सभागृहात पुराव्यासकट ओबीसी आरक्षणावर भाष्य केले त्यामुळे विरोधक चिडले. जे घडलं तेच सांगितले. बाहेर वेगळे आणि आतमध्ये वेगळे ही माझी परंपरा नाही. जे आहे तेच सत्य बोललो. जर माझ्याबद्दल खोटं वाटत असेल तर सीसीटीव्ही कॅमेरा बघून कारवाई करावी. मी खोटा असल्याचं सिद्ध झालं तर जितकी शिक्षा तुम्हाला दिली आहे. ती तालिका अध्यक्ष असलो तरी मी घ्यायला तयार आहे असंही आव्हानही भास्कर जाधव यांनी विरोधकांना दिलं आहे.

 सत्ताधाऱ्यांनी रचलं षडयंत्र

ओबीसी आरक्षणावरून सरकारची कोंडी होत असल्याचं कळताच सत्ताधाऱ्यांनी एक षडयंत्र रचलं. ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाही यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे. २०२२ च्या निवडणुकीपर्यंत ओबीसींना आरक्षण न देण्याचा डाव आहे. सभागृहात विरोधकांचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र रचण्यात आलं. त्यानंतर भाजपाच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केला.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपाNitesh Raneनीतेश राणे vidhan sabhaविधानसभा