शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 19:18 IST

मुकुंद पाठक, सिंदखेडराजा Vidhan Sabha election Maharashtra 2024:लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे ...

मुकुंद पाठक, सिंदखेडराजाVidhan Sabha election Maharashtra 2024:लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून निवडणूक लढवली. त्याच पद्धतीचा राजकीय पॅटर्न सिंदखेडराजा मतदारसंघात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या राजेंद्र शिंगणेंनी विधानसभा निवडणूक जाहीर होताच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा मजबूत असलेल्या सिंदखेडा राजा मतदारसंघावर महायुतीतील इतर मित्रपक्षांनी दावा करण्यास सुरुवात केली आहे.  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात एकमेव असलेल्या या मतदारसंघावरील आपला दावा सोडण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील पेच महायुतीला सोडता आलेला नाही. 

आपलाच उमेदवार निवडणूक लढवणार 

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षातील एक्झिटनंतर अजित पवार पक्षाकडे उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यातच काझी हेच निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे सांगून काझी यांनी वरिष्ठांकडे याचा निर्णय टोलवला आहे.

भाजपा, काँग्रेस व शिंदेसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुंबईत गाठीभेटी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) याच पक्षांतून आयात केलेल्याला उमेदवारी देईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. 

सिंदखेडराजा विधानसभा हे आहेत उमेदवारीसाठी इच्छुक 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव मनोज कायंदे या तीन प्रमुख उमेदवारांची या मतदारसंघात लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. 

राजकीय समीकरणे तपासून या उमेदवारांनी आजपर्यंत आपल्या उमेदवारीचा आग्रह सोडलेला नाही. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मतदारसंघावरील आपला दावा सोडणार नसल्याने येथे पेच आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sindkhed-raja-acसिंदखेडराजाMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार