महाविकास आघाडी सरकारमधील गृहमनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपला फोन टॅप गेला जात असल्याचा दावा केला आहे. यापूर्वीही काही नेत्यांनी फोन टॅप होत असल्याचा दावा केला होता. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होतोय असं वाटतं असल्याचं म्हटलं. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत आपला फोन टॅप होत असल्याचा दावा केला. आव्हाड यांनी रात्री दीडच्या सुमारास एक ट्वीट करत हा दावा केला. "माझा फोन टॅप होत असल्याचा मला संशय येत आहे. विशेषत: माझ्या व्हॉट्सअॅप कोणत्यातरी संस्थेकडून निगराणी ठेवली जात आहे," अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं.
फोन टॅप होत असल्याचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 08:25 IST
Jitendra Awhad : आव्हाड यांनी मध्यरात्री केला आपला फोन टॅप होत असल्याचा दावा
फोन टॅप होत असल्याचा संशय; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटनं खळबळ
ठळक मुद्देआव्हाड यांनी मध्यरात्री केला आपला फोन टॅप होत असल्याचा दावा यापूर्वी राऊत यांनीदेखील फोन टॅपिंगविरोधात केले होते गंभीर आरोप