शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

"वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू"; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:19 IST

Maharashtra Legislative Assembly BJP Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

मुंबई - विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सोमवारी सभागृहात बोलत असताना विरोधी बाकावरील सदस्यांनी अभूतपूर्व गदारोळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माइक ओढला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली गेली. या सगळ्या प्रकारामुळे अखेर भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या 12 पैकी चौघे माजी कॅबिनेटमंत्री राहिले आहेत. याच दरम्यान भाजपाने आता ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. 

"वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू" असं म्हणत भाजपाने हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दोन दिवसीय विधिमंडळ अधिवेशनात काल सोमवारी नियोजित बनाव रचून माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन  करण्यात आले. या दंडेली विरुद्ध कांदिवली पूर्व विधानसभेत संतप्त निदर्शने करण्यात आली. वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; १७० आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय?"

"ज्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अर्वाच्च शिवीगाळ केली त्यांनीच माझ्यासह भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले. शकुनीने कपटाने फासे टाकलेत, पण जनता उघड्या डोळ्यांनी सर्व काही पाहते आहे. आज लोकांनी रस्त्यावर उरतून वसूली सरकार आणि घरबशा मुख्यमंत्र्यांचा उत्स्फूर्त निषेध केला" असं देखील अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. याआधीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस झालेले नाही. 170 आमदार पाठीशी असून इतकेही बळ नसेल तर उपयोग काय? यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे…." असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

"आमदारकी गेली तर चालेल, रस्त्यावर संघर्ष सुरूच राहील; निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही"

भाजपाचे आमदार राम सातपुते (BJP Ram Satpute) यांनी "आम्ही शिवीगाळ केलेली नाही. एक कथा रचून आमचं निलंबन करण्यात आलं. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. आमदारकी गेली तरी चालेल. पण जनतेच्या प्रश्नांसाठी लढतच राहणार. बारा आमदारांचं निलंबन म्हणजे ठाकरे सरकारची हिटलरशाही" असं म्हटलं आहे. तसेच सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही याबाबत ट्विट केलं आहे. "ओबीसी आरक्षणासाठी लढताना आमचे एक वर्षांसाठी निलंबन झाले... आम्ही सरकारच्या हिटलर प्रवृत्तीचा निषेध करतो" असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण