शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, आजपासूनच गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार : दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 12:56 IST

अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर राज्याच्या गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देवळसे-पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातातयापूर्वीही त्यांनी सांभाळली होती अनेक पदांची धुरा

अनिल देशमुख यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावर राज्याच्या गृहमंत्रिपदाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती. आता उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कामगार खात्याचा अतिरिक्त कार्यभार हा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, आज दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. "गृहमंत्रिपदाची जबाबदारी मोठी आहे. ती पार पाडायला आवडेल. आजच मी त्या पदाची सूत्रं हाती घेणार आहे. ही सूत्रं हाती घेण्यापूर्वी मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं मार्गदर्शनही घेतलं," असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. वळसे-पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातातवळसे पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. सुरुवातीच्या काळात पवार यांचे साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हेदेखील आमदार होते. गृहमंत्रिपदासाठी शरद पवार कोणाला संधी देतात, याविषयी दिवसभर जोरदार चर्चा होती. जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते. यापूर्वी त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळलेदेखील आहे. त्याशिवाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, पवार यांनी वळसे पाटील यांच्या नावाला पसंती दिली. अजित पवार यांनीही वळसे पाटील यांच्या बाजूने कौल दिला, असे सूत्रांनी सांगितलं.

वळसे पाटील यांचा प्रवासदिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघाचे सातव्यांदा आमदार आहेत. त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, ऊर्जामंत्रिपद तसेच विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. अत्यंत अभ्यासू आणि नम्र लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSharad Pawarशरद पवारAnil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्रHome Ministryगृह मंत्रालय