Maharashtra Corona Updates: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 01:54 PM2021-05-08T13:54:18+5:302021-05-08T13:55:03+5:30

Maharashtra Corona Updates: कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.

Maharashtra Corona Updates Prime Minister Modi praised Maharashtras Corona fight cm thackeray also thanked center | Maharashtra Corona Updates: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार!

Maharashtra Corona Updates: पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक, मुख्यमंत्री ठाकरेंनीही मानले आभार!

Next

Maharashtra Corona Updates: कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला खूप चांगल्या पद्धतीनं करतोय, असं मोदी म्हणाले. (Maharashtra Corona Updates Prime Minister Modi praised Maharashtras Corona fight CM Thackeray also thanked center)

पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'फोन पे चर्चा'; CoWIN अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांनी लिहिलं पत्र, म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणासाठीच्या को-विन अॅपबाबतच्या त्रृटींसंदर्भात पंतप्रधान मोदींना पत्र लिहीलं होतं. को-विन अॅपमध्ये बऱ्याच त्रृटी असून राज्याला स्वतंत्र अॅप विकसीत करण्याची परवानगी देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या पत्रानंतर मोदींनी थेट फोनकरुन महाराष्ट्रातील कोरोना लढ्याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी  विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. 

राज्यातील लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ होणार का?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती...

पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सुचना केंद्राने मान्यही केल्या याविषयी मुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधानांचे आभार मानले. दरम्यान, लसीकरणासंदर्भातील राज्य सरकारच्या स्वतंत्र अॅपसाठीच्या मागणीवर पंतप्रधान मोदींनी नेमकी कोणती भूमिका घेतली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण दोन्ही नेत्यांमध्ये अॅपबाबत चर्चा झाल्याची माहिती कळत आहे. तसेच लसीच्या पुरवठ्याबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

Read in English

Web Title: Maharashtra Corona Updates Prime Minister Modi praised Maharashtras Corona fight cm thackeray also thanked center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app