शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha:भाजप आमदाराकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; देवेंद्र फडणवीसांकडून लगेच दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 16:52 IST

Maharashtra Budget Session : मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या नावाचा एका सदस्याकडून एकेरी उल्लेख

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान त्यांच्या नावाचा एका सदस्याकडून एकेरी उल्लेखराज्यपालांकडून सरकारचं कौतुक पचवणं अनेकांना जड, मुख्यमंत्र्यांचा टोला

सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. सुरूवातीला अभिभाषणावरून बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणादरम्यानही विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळादरम्यान विरोधी पक्षातील एका नेत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. यानंतर सभागृहात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनीही यावर आक्षेप घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण थांबवलं आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी आपली हरकत नोंदवली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या कोणत्याच नेत्याच्या भाषणादरम्यान व्यत्यय आणला नाही. त्यामुळे तशीच अपेक्षा आताही असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच याबाबत समज देण्यात यावी अशी विनंतही त्यांनी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित उभं राहत जर मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतं असं म्हटलं. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण सुरू केलं. विरोधकांना टोला"राज्यपाल कोश्यारींनी राज्य सरकारच्या कामगिरीची माहिती त्यांच्या अभिभाषणातून दिली. त्यांनी सरकारचं कौतुक केलं. ते पचवणं अनेकांना जड गेलं. कारण ते कौतुक अनपेक्षित होतं. राज्यपाल म्हणजे व्यक्ती नाही, ती संस्था आहे, असं विरोधक म्हणतात. त्यामुळेच त्यांचं भाषण महत्त्वाचं आहे. राज्यपाल मराठीत बोलले हेही नसे थोडके," असं मुख्यमंत्री म्हणाले. मी कोरोना काळातला सगळा हिशोब देतो. तुम्ही केंद्राकडून पीएम केअर्सचा हिशोब मागणार का, असा सवाल त्यांनी विरोधकांनी केला. तुम्ही माझ्याकडे हिशोब मागू शकता. पण पीएम केअर्सची माहिती आरटीआयमध्येही येत नाही आणि काही विचारलं तर तो देशद्रोह ठरतो. ही यांची लोकशाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Parabअनिल परबDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस