शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सॅम पित्रोडांना 'त्या' विधानाबद्दल लाज वाटायला हवी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 17:52 IST

पित्रोडांनी जाहीर माफी मागायला हवी; राहुल गांधींनी टोचले कान

फतेहगड: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या शीखविरोधी दंगलीवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस नेते सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त विधानामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. शीखविरोधी दंगलीबद्दल केलेल्या विधानाची सॅम पित्रोडांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पित्रोडांचे कान टोचले आहेत. पित्रोडांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागायला हवी, असंदेखील गांधी म्हणाले. ते पंजाबमधल्या फतेहगडमध्ये जनसभेला संबोधित करत होते.  '1984 मध्ये झालेल्या दंगलीबद्दल पित्रोडा जे काही बोलले, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यासाठी त्यांनी देशाची माफी मागायला हवी. ते जे काही बोलले, ते अत्यंत चुकीचं होतं हे मी त्यांना फोनवर सांगितलं आहे. त्यांना या विधानाबद्दल लाज वाटायला हवी आणि या प्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागायला हवी,' असं राहुल गांधी म्हणाले. पित्रोडा यांना शुक्रवारी 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जे झालं ते झालं, असं उत्तर पित्रोडांनी दिलं. सॅम पित्रोडांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या सर्वच नेत्यांनी जोरदार टीका केली. पित्रोडांच्या विधानातून काँग्रेसचा अहंकार आणि चारित्र्य दिसतं, अशा शब्दांत मोदींनी पित्रोडांच्या विधानाचा समाचार घेतला. 'काँग्रेसचे वरिष्ठ नेते 1984 मध्ये दंगल झाली तर झाली असं म्हणतात. हे नेते कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का? ते गांधी कुटुंबाच्या अत्यंत जवळचे आहेत. ते राजीव गांधींचे खूप चांगले मित्र होते आणि काँग्रेसच्या नामदार अध्यक्षांचे गुरू आहेत,' अशी घणाघाती टीका मोदींनी शुक्रवारी रोहतकमधल्या जनसभेत केली होती.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी1984 Anti-Sikh Riots1984 शीखविरोधी दंगलcongressकाँग्रेस