शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरिबी, बेरोजगारी आऊट, चौकीदार इन; पाच वर्षात 'अशी' बदलली मोदींची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:06 IST

पाच वर्षांत मोदींच्या भाषणांमधले मुद्दे पूर्णपणे बदलले

नवी दिल्ली: पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, घोटाळ्यांवरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यावेळी मोदींना सोशल मीडियाची उत्तम साथ लाभली. मात्र पाच वर्षानंतर मोदींच्या भाषणातले मुद्दे पूर्णपणे बदलल्याचं दिसतं. 2014 मध्ये मोदींनी त्यांच्या भाषणांमध्ये गरीब हा शब्द सर्वाधिक वेळा वापरला होता. मात्र यंदा त्यांनी चौकीदार हा शब्द सर्वाधिक वेळा वापरला आहे. इंडिया टुडे या संकेतस्थळानं मोदींच्या पाच वर्षातील बदललेल्या भाषणांवर एक वृत्त प्रकाशित केलं आहे. यासाठी 2014 आणि 2019 मधील मोदींच्या प्रत्येकी 5 सभांमधील भाषणांचे मुद्दे विचारात घेण्यात आले. 2014 मधील मोदींच्या पाटणा, वाराणसी, दिल्ली, चेन्नई, मेरठ इथल्या सभांचा आणि 2019 मधील मोदींच्या भागलपूर, केंद्रपाडा, मुरादाबाद, पणजी आणि बुनियादपूरमधल्या सभांची तुलना करण्यात आली आहे. 2014 मध्ये मोदींनी गरीब शब्दावर सर्वाधिक जोर दिला होता. तेव्हाच्या त्यांच्या भाषणात 55 वेळा गरीब शब्द आला होता. मात्र यंदा त्यांनी हा शब्द 44 वेळा वापरला. तरीही मोदींच्या भाषणांचा विचार केल्यास गरीब हा शब्द त्यांनी सर्वाधिक वापरलेल्या शब्दांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोदींनी यंदा चौकीदार शब्दाचा सर्वाधिक वेळा वापर केला आहे. या शब्द त्यांनी तब्बल 106 वेळा वापरला आहे. चौकीदार, गरीब यांच्या व्यतिरिक्त 2019 मधील भाषणात मोदी (42), काँग्रेस (38), विकास (31), किसान (23), बीजेपी (21) या शब्दांचा मोदींनी सर्वाधिक वापर केला. तर 2014 मध्ये मोदींनी काँग्रेस (43), बीजेपी (31), गुजरात (28), किसान (28), विकास (25) या शब्दांवर विशेष जोर दिला होता. गरिबी, बेरोजगारी या मुद्द्यांना भाजपानं संकल्पपत्रात फारसं स्थान दिलेलं नाही. त्यामुळेच मोदींनीदेखील त्यांच्या भाषणात या मुद्द्यांवर भाष्य केलं नाही. 2014 मधल्या भाषणांमध्ये मोदींनी गरिबी शब्दाचा 19 वेळा वापर केला होता. मात्र यंदा मोदींनी केवळ तीनवेळा त्यांच्या भाषणात गरिबी शब्द उच्चारला आहे. 2014 मध्ये मोदींनी सहावेळा बेरोजगारी शब्द वापरला. मात्र यंदा त्यांनी हा शब्द वापरलेलाच नाही.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस