शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 22:03 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल

परभणी :  गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेला निवडून देऊनही जिल्हा विकासापासून कोसो दूर राहिला आहे. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी तालुक्यातील जाहीर सभेमधून शिवसेनेवर केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मोदी गेल्या पाच वर्षांतील विकासकामांवर का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे येथे रविवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वर्धा, गोंदिया, नांदेड या ठिकाणी  झालेल्या तिन्ही सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांच्यावरच खालच्या पातळीत टीका चालवली आहे. इतिहास पूर्णपणे झाकून स्वत:ची प्रतिमा उंचावण्याची ते प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष गेल्या ५ वर्षातील विकासकामांवर ते का बोलत नाहीत? स्वत:च्या अजेंड्यावर का? बोलत नाहीत, त्यांचा खोटारडेपणा जनतेने ओळखला आहे. त्यामुळे त्यांच्या भूलथापांना आता कोणीही बळी पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली. जयंत पाटील यांनी भाजपासोबतच शिवसेनेवरही शरसंधान साधलं. ३० वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून दिला. तरीही जिल्ह्याचा विकास झालेला नाही. त्यामुळे झालेल्या चुकांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या अधोगतीला शिवसेनेबरोबरच भाजपाही तेवढीच जबाबदार आहे. शिवसेनेला ३० वर्षे दिलीत. आता एकदा राष्ट्रवादीला संधी द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, आ. मधुसूदन केंद्रे, आ. विजय भांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, उमेदवार राजेश विटेकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी खा. सुरेश जाधव,  अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख,  भावनाताई नखाते, नंदा राठोड, संतोष बोबडे, किरण सोनटक्के, रमाकांत कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीparbhani-pcपरभणीJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना