शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

देशात हुकूमशाही नको असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर ठेवा- भुजबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 23:13 IST

जळगावच्या सभेत भुजबळांची मोदींवर सडकून टीका

जळगाव : पुन्हा जर भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आले, तर सन २०२४ ची निवडणूक होणार नाही. या देशात हुकूमशाही सुरू होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाप्रमाणे या देशाचे मालक बनवले आहे. चौकीदार नाही. तसेच ओबीसींचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत आणा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. जळगाव जामोद येथे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. काहीही कारण नसताना माझ्यासह अनेकांना तुरूंगात डांबणाऱ्या भाजपा सेनेला आपण मतदान करणार काय? असा भावनिक सवालही छगन भुजबळ यांनी केला. नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिला नाही, अशी टीका भुजबळांनी केली.शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. नोटाबंदीने देशातील १ कोटी छोटे उद्योग बंद पडले. मेक इन इंडिया तर दूरच उलट लढाऊ विमानांचा मोठा राफेल घोटाळा या सरकारने केला. गत पाच वर्षात कायदा व सुव्यवस्था धुळीला मिळाली आहे. दिवाळे निघालेल्या अनिल अंबानीला ९ हजार कोटीचे काम देण्यात आले म्हणजेच हे सरकार धनिकांचे आहे. गोरगरीबांचे नाही. महाराष्ट्र सदनाच्या ठेकेदाराला एक रूपयाही आजपर्यंत मिळाला नाही. मग मी त्यामध्ये ८५० कोटींचा भ्रष्टाचार केला हे म्हणणे म्हणजे चक्क शासनाचा खोटारडेपणा आहे. अशा भाजप-सेनेच्या सरकारच्या सत्ता देऊ नका नाहीतर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019jalgaon-pcजळगावChhagan Bhujbalछगन भुजबळNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा