शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

काँग्रेसकडून 'न्याया'ची हमी; भाजपाच्या 30 जागा होणार कमी?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 1:40 PM

भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून आकडेवारी समोर

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जाहीर केलेल्या न्याय योजनेनं भाजपाच्या जागा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे भाजपानं केलेल्या सर्वेक्षणातूनच ही आकडेवारी समोर आली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना वर्षाला 72 हजार रुपयांची मदत देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं. यानंतर भाजपाकडून सर्वेक्षण करण्यात आलं. किमान उत्पन्न योजनेमुळे (न्याय) भाजपाच्या 30 जागा कमी होऊ शकतात, अशी माहिती यातून समोर आली. शेतकऱ्यांची नाराजी असलेल्या भागांमध्ये न्याय योजना भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते, अशी माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. त्यानंतर मोदींनी स्वत:ला देश का चौकीदार म्हटलं. मैं भी चौकीदार हे सोशल मीडिया कॅम्पेनदेखील भाजपाकडून राबवलं जाऊ लागलं. एअर स्ट्राइकसारख्या धडक कारवाईचा निवडणुकीत फायदा होईल, अशी भाजपाला आशा होती. काही दिवस एअर स्ट्राइकमुळे भाजपाच्या जागा वाढतील, अशी स्थिती होती. मात्र त्याचा परिणाम लवकरच कमी झाला. राहुल गांधींनी न्याय योजनेची घोषणा केल्यावर सर्वसामान्यांमध्ये त्याची चर्चा झाली. या योजनेच्या अंतर्गत 12 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्यांना सरकार वर्षाकाठी 72 हजारांची मदत थेट बँकेत देणार असल्याची घोषणा राहुल यांनी केली. याचा फायदा देशातील 5 कोटी कुटुंबांना होईल, असा दावा त्यांनी केला. राहुल यांच्या या योजनेनंतर भाजपानं सर्वेक्षण केलं. 'बालाकोट एअर स्ट्राइकनंकर आम्हाला 230-240 जागा मिळतील, असा अंदाज वाटत होता. मात्र आता 30 जागा कमी मिळतील,' असं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. छत्तीसगडमध्ये न्यायचा सर्वाधिक फटका बसेल, असं भाजपाचं सर्वेक्षण सांगतं. याशिवाय राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणातही न्यायचा परिणाम जाणवेल, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली. मात्र सर्वाधिक खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशात न्यायचा परिणाम तितकासा जाणवणार नाही, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात अस्वस्थता आहे. मात्र या भागातील मतदार जातीपातीच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे न्यायचा फारसा प्रभाव जाणवणार नाही, असं भाजपाचं सर्वेक्षण सांगतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकChhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश