शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Video: उत्तर प्रदेशातून माणसं आणून कुत्र्यासारखं मारेन; भाजपा उमेदवाराची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 11:53 AM

धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

कोलकाता: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पूर्ण झाला आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का देण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. कधीकाळी ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या माजी पोलीस अधिकारी भारती घोष यांना भाजपानं घाटल लोकसभा मतदासंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाल्यानं घोष वादात अडकल्या आहेत. जास्त हुशारी दाखवलीत, तर उत्तर प्रदेशातून माणसं बोलावून कुत्र्यासारखं मारेन, अशी धमकी भारती घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी सौजन्यानं वागा, मर्यादा सोडू नका, असं आवाहन केल्यानंतर घोष यांचा धमकी देत असतानाच व्हिडीओ समोर आला. 'स्वत:च्या घरात जा. जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडे लपण्यासाठी कोणतीही जागा नाही. मी तुम्हाला घरातून बाहेर काढून कुत्र्यासारखं मारेन. तुम्हाला मारण्यासाठी उत्तर प्रदेशातून हजारो माणसं आणेन,' अशी धमकी घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना दिली. या प्रकरणी तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं पक्षाचे नेते पार्थ चॅटर्जी यांनी सांगितलं. घोष यांनी घाटल मतदारसंघात प्रचारादरम्यान तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट धमकी दिली. याआधी पोलीस सेवेत असताना त्यांच्याकडे याच भागाच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी होती. निवडणूक आयोगानं या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. आयोगानं कोणाच्याही तक्राराशिवाय घोष यांच्या विधानाची दखल घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtmcठाणे महापालिकाBJPभाजपाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019ghatal-pcघटल