शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात निकाल वंचित बहुजन आघाडीविरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालय ठेवणार नाही- भीम आर्मी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 21:54 IST

प्रकाश आंबेडकरांकडून कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन

सोलापूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला असताना चिथावणीखोर विधानं येण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर मतदारसंघात निकाल वंचित बहुजन आघाडीविरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालय ठेवणार नाही, अशी धमकी भीम आर्मीकडून देण्यात आली आहे. यावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली आहे. या मतदारसंघातील निकाल विरोधात गेल्यास भाजपाचं एकही कार्यालयं ठेवणार नाही. भाजपाच्या नेत्यांना फिरू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीनं दिला. सोलापूरात आंबेडकर यांच्या विरोधात भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत.भीम आर्मीच्या धमकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केलं. 'निवडणुकीचे निकाल काहीही लागले, तरी हिंसाचार होणार नाही याची काळजी घ्या. भीम आर्मीचा हिंसाचार आम्हाला मान्य नाही. त्याला कार्यकर्त्यांनी बळी पडू नये,' असं आवाहन आंबेडकरांनी केलं. शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयाचं नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या, असं आवाहन त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९solapur-pcसोलापूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBhim Armyभीम आर्मीBJPभाजपा