शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: उमेदवार कोण? पुण्यनगरीमध्ये एकच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:26 IST

भाजपाकडून शिरोळे की बापट?; काँग्रेसमध्ये मोहन जोशी यांच्यासह चौघे इच्छुक

पुणे : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजून आचारसंहिता लागू झाली तरी पुणे मतदारसंघात अजून सामसूमच आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये अजून उमेदवारांची चाचपणीच सुरू असल्याने ‘उमेदवार कोण?’ हाच प्रश्न सध्या पुण्यात विचारला जात आहे.भाजपात विद्यमान खासदार अनिल शिरोळे व पालकमंत्री गिरीश बापट या दोघांमध्ये चूरस आहे. शिरोळे यांनी शहरातील वेगवेगळ्या स्तरांमधील प्रमुख लोकांबरोबर मुलगा सिद्धार्थ याच्या माध्यमातून संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. बापट यांनी उमेदवारीमधील आपला रस लपवून ठेवलेला नाही, मात्र पक्ष देईल तो आदेश मान्य आहे, अशीच त्यांची भूमिका आहे. राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून पाच टर्म काढल्यानंतर आता खासदार म्हणून राष्ट्रीय राजकारणात काम करायला आवडेल, असे ते सांगतात.पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे समन्वयक म्हणून बापट तसेच शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त बुधवारी सकाळी जाहीर झाले. त्यानंतर त्यांच्या गोटात बरीच खळबळ उडाली. उमेदवारी मिळणार की नाही अशी शंका त्यामुळे व्यक्त होऊ लागली. मात्र रात्री पालिकेतील पक्षाच्या सर्व नगरसेवकांसाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवून बापट यांनी अजूनही आपण स्पर्धेत असल्याचे दाखवून दिले. काँग्रेसमध्येही उमेदवारीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अ‍ॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे व पक्षाबाहेरून प्रवीण गायकवाड, संजय काकडे यांची नावे चर्चेत आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाPuneपुणेanil shiroleअनिल शिरोळेgirish bapatगिरीष बापटcongressकाँग्रेस