शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्यांना मतदान करा- मेवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 08:56 IST

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचा आप उमेदवारासाठी प्रचार

नवी दिल्ली: तुमच्या मुलांना अयोध्येला नव्हे, तर ऑक्सफर्डला पाठवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असं आवाहन गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केलं आहे. पूर्व दिल्ली मतदारसंघातील आम आदमी पार्टीच्या उमेदवार अतिशी यांच्यासाठी प्रचार करताना मेवाणींनी हे आवाहन केलं. हिंदू-मुस्लिम राजकारण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीब मुलांना अयोध्येला पाठवायचं आहे, असं मेवाणी म्हणाले. 'मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्यालाआपल्या पुढच्या पिढीला कुंभ किंवा अयोध्येला पाठवायचं नाही. तर ऑक्सफर्ड विद्यापीठात पाठवायचं आहे. अतिशी यांचं शिक्षण केंब्रिज विद्यापीठात झालं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांना ऑक्सफर्ड, केंब्रिज विद्यापीठांमध्ये पाठवूया,' असं आवाहन मेवाणींनी अतिशींसाठी प्रचार करताना केलं. 'अतिशी यांनी शिक्षण क्षेत्रात एक मॉडेल तयार केलं. तसं मॉडेल गुजरातमध्ये कुठेच दिसत नाही,' अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या गुजरात मॉडेलवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन सिलिंडरच्याअभावी 63 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यासाठी डॉ. काफील खान यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. त्यांनीदेखील अतिशी यांचा प्रचार केला. काफील खान यांनी ऑक्सिजन सिलिंडर मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले होते, असा दावा आपकडून करण्यात आला. 'अतिशींचा लढा आरएसएसचं समर्थन असलेल्या क्रिकेटपटूशी (गौतम गंभीर) आहे. त्यामुळे मतदारांनी अतिशींच्या मागे खंबीरपणे उभं राहावं,' असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीत 12 मे रोजी मतदान होणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019east-delhi-pcपूर्व दिल्लीGautam Gambhirगौतम गंभीरNarendra Modiनरेंद्र मोदीJignesh Mevaniजिग्नेश मेवानीBJPभाजपाAAPआप