शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पवारांची पॉवर दिसणार; सुप्रिया सुळे, पार्थ पवार जिंकणार- सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 19:16 IST

बारामती, मावळमध्ये राष्ट्रवादी जिंकणार असल्याचा अंदाज

मुंबई: लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध झाले. या सर्वच पोल्समधून देशात एनडीएचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत पवार कुटुंबाचं काय होणार, याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि नातू पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामतीतून निवडणूक लढवत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपाच्या कांचन कुल यांचं आव्हान आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीला यंदा खिंडार पाडण्याचे दावे भाजपा नेत्यांनी केले होते. त्यासाठी भाजपाचे अनेक दिग्गज नेते बारामतीत तळ ठोकून होते. मात्र बारामती यंदाही पवारांना साथ देणार असल्याचं एबीपी नेल्सनच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवारांचे नातू मावळमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. पार्थ पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवार यांनी पार्थ यांच्यासाठी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल आणि पार्थ निवडून येतील, असा अंदाज एबीपी नेल्सनच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीSupriya Suleसुप्रिया सुळेparth pawarपार्थ पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाmaval-pcमावळbaramati-pcबारामती