Raj Thackeray: ‘नमों’ची क्लिपिंग पाहूया,‘राजां’च्या सभेला जाऊया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 11:53 IST2019-04-18T11:46:52+5:302019-04-18T11:53:07+5:30

राज ठाकरेंच्या धडाकेबाज प्रचारावर एक मजेशीर कविता...

Lok Sabha Election 2019: Satirical poem on Raj Thackeray rallies | Raj Thackeray: ‘नमों’ची क्लिपिंग पाहूया,‘राजां’च्या सभेला जाऊया...

Raj Thackeray: ‘नमों’ची क्लिपिंग पाहूया,‘राजां’च्या सभेला जाऊया...

>> अभय नरहर जोशी 

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...
आरोपांचे धूर हवेत काढी
‘नमों’ची क्लिपिंग पाहूया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजा’ करती वार मोठे
म्हणती ‘नमो’ आहेत खोटे
‘कमळी’स होणार का तोटे?
सगळे ऐकून घेऊया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजां’चे इंजिन दिमाखदार
‘घड्याळा’नुसार धावणार
भलतेच डबे हे जोडणार
‘पंजा’चे सिग्नल पाळूया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजां’चे बोलणे धारदार
त्यांची पोरं खोडकर फार
‘कमळी’ची छेड काढणार
टोकाचा बदल अनुभवूया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...


‘राजां’ची रेल्वे पॅसेंजर 
थांबे कुठल्याही स्टेशनवर
जेव्हा येईल आपले घर
तेव्हा उतरून घेऊया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजां’ना गर्दी खेचण्याची नॅक
पोरांना जमते ‘खळखट्याक’
टाळ्या-शिट्ट्या ऐकूया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजां’चे जाहीर प्रेझेंटेशन
त्याच त्याच मुद्द्यांचे शिकरण
नवीन मुद्दा शोधूया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजा’ मोठा कलाकार
रेषेला त्यांच्या वेगळीच धार
मनसोक्त हसून घेऊया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

‘राजां’च्या आवाहनात कळकळ
त्यांची नवनिर्माण चळवळ
दिशा ही समजून घेऊया
‘राजां’च्या सभेला जाऊया...

झुक झुक झुक झुक अगीनगाडी...

Web Title: Lok Sabha Election 2019: Satirical poem on Raj Thackeray rallies