शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन; ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 2:59 PM

तृणमूल काँग्रेस आणि भाजपामधील वाद चिघळला

कोलकाता: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद टोकाला गेला आहे. तृणमूलवर केलेले आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन, असा इशारा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहांना दिला. तृणमूलवर खोटे आरोप करताना लाज वाटत नाही का, असा सवालदेखील ममता यांनी विचारला. कोलकात्यात अमित शहांच्या रोड शोवेळी झालेला हिंसाचार आणि त्यानंतर शहांनी तृणमूलवर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी बोलत होत्या. शहांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. 'भाजपानं निवडणूक आयोगाकडे आमची तक्रार केल्याचं काल रात्री समजलं. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर आमची सभा होऊ नये, यासाठी भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. निवडणूक आयोग भाजपाचा भाऊ आहे. आधी आयोग निष्पक्ष होता. मात्र आता निवडणूक आयोग विकला गेला आहे, असं प्रत्येकजण म्हणतो,' अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर टीकेची झोड उठवली. भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनाही ममता यांनी लक्ष्य केलं. 'आम्ही विद्यासागर यांचा पुतळा उभारु असं मोदी म्हणतात. बंगालकडे पुतळा उभारण्यासाठी पैसा आहे. तुम्ही पुतळा उभाराल. पण 200 वर्षांचा वारसा पुन्हा आणू शकाल का?', असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. पुतळा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तोडला, याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करता. खोटं बोलायला तुम्हाला लाज वाटत नाही का? आमच्यावर केलेले आरोप सिद्ध करा. अन्यथा तुरुंगात टाकेन, असा इशारा त्यांनी दिला.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा