शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मोदींनी पत्रकार परिषद घेतली, पण एकटेच बोलले... पत्रकारांचे प्रश्न टाळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:42 IST

पत्रकारांच्या प्रश्नांना अमित शहांनी दिली उत्तरं

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर आज पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान झाल्यानंतरची मोदींची ही पहिलीच पत्रकार परिषद होती. मात्र या पत्रकार परिषदेत मोदी एकटेच बोलले. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी उत्तर दिली. मोदींनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असंदेखील शहा पत्रकार परिषदेत म्हणाले.पंतप्रधान मोदी पत्रकार परिषदेला उपस्थित करताना सर्वच प्रश्नांची उत्तरं शहांनी दिली. पंतप्रधानांना विचारण्यात आलेला एक प्रश्न त्यांनी मोठ्या खुबीनं शहांकडे टोलवला. 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं मोदी म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं शहांनी म्हटलं.भाजपाच्या पत्रकार परिषदेला अमित शहांनी सुरुवात केली. त्यांनी मोदी सरकारच्या योजनांची विस्तृत माहिती दिली. यानंतर मोदींनी पत्रकारांशी बोलण्यास सुरुवात केली. 'आधी माझं हेच काम असायचं. संध्याकाळी पक्ष कार्यालयात यायचं. पत्रकार मित्रांशी संवाद साधायचा. आज दिवसभर मध्य प्रदेशात होतो. त्यामुळे येण्यास उशीर झाला,' असं मोदी सुरुवातीला म्हणाले. लोकसभा निवडणूक सुरू असताना आयपीएल, रमजानदेखील झाला. हीच लोकशाहीची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलं.आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून निवडणुकीला सामोरे गेलो. जनता पुन्हा एकदा बहुमत देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकाच पक्षाचं बहुमताचं सरकार केंद्रात सत्तेत पुन्हा येणार, हे कित्येक वर्षांनंतर देशात घडेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. देशातल्या जनतेनं गेल्या पाच वर्षांत कायम साथ दिली. अनेक चढ-उतार आले. पण देश कायम सरकारच्या पाठिशी राहिला, असं म्हणत मोदींनी देशवासीयांचे आभार मानले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शहा