शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: आघाडीत जागावाटपाचा खल; युतीचा नारळ फुटणार २४ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:30 IST

घटक पक्षांच्या भूमिकेमुळे आघाडीत चिंता

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना चार दिवसांनी निघणार असताना काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील जागा वाटपाचा घोळ अजून संपलेला नाही. तर भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ २४ मार्चला कोल्हापूरात फुटणार आहे.राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी पक्षातून दबाव वाढत असून विखे गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीत जागांचे वाटप कसे झाले आहे, हेही अजून गुलदस्त्यात असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. औरंगाबाद, पुणे येथे काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्याने या जागांची मागणी राष्टÑवादीने केली. मात्र, काँग्रेसला ती मान्य नाही.अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित विकास आघाडीची सर्व जागा लढविण्याची घोषणा आणि खा. राजू शेट्टी यांची पुन्हा भाजपासोबत जाण्याची तयारी, यामुळे आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. खा. शेट्टी यांनी आघाडीकडे हातकणंगलेसह वर्धा आणि बुलडाणा या तीन जागांची मागणी केली आहे. बुलडाण्यातून रविकांत तुपकर तर वर्ध्यातून सुबोध मोहिते यांना ‘स्वाभिमानी’ची उमेदवारी असले. हातकणंगलेशिवाय आणखी जागा सोडण्याची आघाडीची तयारी नाही. कारण, बुलडाण्यात राजेंद्र शिंगणे (राष्टÑवादी) तर वर्धातून चारुलता टोकस यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.कोल्हापुरातून युतीचा प्रचार शुभारंभयुतीच्या प्रचाराचा शुभारंभ २४ मार्चला कोल्हापूरात होणार आहे. मंंगळवारी उशीरा रात्री मातोश्री येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई आदी या वेळी उपस्थित होते. सभेपूर्वी दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचे संयुक्त मेळावे होणार आहेत.काँग्रेसची आज बैठकप्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची गुरुवारी मुंबईत बैठक होत आहे. त्यात जागा वाटप व राधाकृष्ण विखेंबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला तर, पुढे काय? हा प्रश्न आहेच. कारण, काँग्रेस-४२ आणि राष्टÑवादी-४१ असे विधानसभेत संख्याबळ आहे. नारायण राणे यांचे पुत्र नीतेश काँग्रेसचे आमदार असले, तरी ते काँग्रेससोबत आहेत का, याची साशंकता आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसकडे व विधानस परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद राष्टÑवादीकडे अशी विभागणी आहे.दानवे-खोतकर वाद मिटलाभाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जून खोतकर बंड करणार नाहीत. दोघेही मातोश्रीवर येतील. एकोप्याने राहणार असल्याची ग्वाही देतील, असे उद्धव यांनी स्पष्ट केले.राधाकृष्ण विखे दर्शनवारीवर!पुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे हे देवी-देवतांच्या दर्शनवारीवर निघाले आहेत़ बुधवारी त्यांनी तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या चरणी माथा टेकविला. आपली राजकीय भूमिका, वाटचाल गुरुवारी सार्इंच्या दर्शनानंतर हायकमांडशी चर्चा करुन जाहीर करु, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस